• बेकर, संपादक आणि आध्यात्मिक ओढ असलेली व्यक्ती, सर्व एकाच व्यक्तीत: करेन डिसूझा यांना भेटा

  कादंबरीकार डी. एच्.लॉरेन्स एकदा म्हणाले होते, ‘‘स्त्रीयांनी आपले स्वत:चे जीवन जगावे, अन्यथा आपण जगलोच नाही म्हणून पश्चाताप करत त्यांना जगावे लागेल.’’ आणि अगदी याचीच शपथ घेऊन गुरगावच्या 32 वर्षाच्या करेन डिसूझा ह्या योगासने करतात आणि शिकवतात, मैत्रिणींसाठी केक्स बनवितात आणि देशातील एका अग्रणी मिडिया हाऊसच्या प्रवासवर्णनपर नियतकालिकाच्या पूर्णवेळ संपादक म्हणून नोकरी करताना त्या आपल्या कुटुंबासाठी देखील वेळ देतात.

  काही वर्षांपुर्वी करन जेव्हा दुबईला गेल्या तेव्हा त्यांनी योगासने करण्यास सुरूवात केली आणि तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की काम करण्यात त्यांची संपूर्ण वेळ जात आहे.

  ‘‘मी जेव्हा कंपनीत दाखल झाले तेव्हा कंपनी कर्मचारी कमी करत होती, त्यामुळे मी जवळजवळ तीन माणसांचे काम करत होते. माझ्या मैत्रिणींनी मला अॅक्रोयोगा सुरू करण्यास सांगितले. हे ॲक्रोबॅटिक्स आणि योगा यांचे एकत्रित स्वरूप होते आणि त्यामुळे मला तणाव कमी करण्यास आणि माझा उत्साह वाढविण्यास मदत झाली,’’ करन सांगतात. त्यानंतर एक वर्षानंतर त्यांनी त्यांची नोकरी सोडली आणि त्या भारतात परत आल्या आणि धरमशाला येथे एक महिना योगा शिक्षकाचा अभ्यास केला.

   

  Karen D Souza

  Karen D Souza

   

  आज त्या लोकांना शिकवत नसल्या तरी शारीरिक व मानसिक तणाव दूर करण्यासाठी आणि कामात एकाग्रता येण्यासाठी करन रोज किमान अर्धा तास योगासने करण्याची काळजी घेतात. गेले दोन महिने त्या रेकीचा देखील सराव करत आहेत.

  योगासने जरी योगायोगाने घडली असली तरी करन यांचे वय 16 वर्ष असताना त्यांच्या आयुष्यात बेकिंगची शेवटचा पर्याय म्हणून सुरूवात झाली.

  ‘‘माझ्या कुटुंबात, प्रत्येक जण गोड खाणारा होता. त्यामुळे एक दिवस आई खूप दमली आणि म्हणाली आता काही ती येथून पुढे केक बनवणार नाही. आणि अशा प्रकारे मी ते शिकून घेतले आणि हल्ली मी किमान आठवड्याच्या अखेरीस केक करते,’’ त्यापुढे सांगतात.

  तुम्हाला असे वाटत असेल की इतकेच तर नोकरीवरून परत आल्यावर देखील करण व्यक्तिगत वाचन करतात. नोकरीवर देखील त्यांना दिवसभर वाचावे लागते. त्यांना प्रत्यक्ष छापील पुस्तके वाचण्याची जरी आवड असली तरी त्यांच्या प्रकाशनाच्या क्षेत्रातील अनुभवावरून त्या सांगतात की हल्ली ह्या उद्योगाचे ऑनलाईन माध्यमाच्या दिशेने हळूहळू मार्गक्रमण सुरू आहे .

   

  Karen's Cakes

  Karen’s Cakes

  करण यांचे वडिल भारतीय वायूदलातील अधिकारी असल्यामुळे त्यांना कायम स्थलांतर करावे लागत असे त्यामुळे करण यांनी सात वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांना अजूनही प्रवासाची खूप आवड आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या आवडी त्या जोपासतात त्यामुळे त्यांना आनंद मिळतो. दोन मांजरांचे पालकत्व स्वीकारलेल्या करण ह्या दिल्लीतील उम्मिद ह्या संरक्षण व पुनर्वसन करणा-या संस्थेसाठी स्वयंसेवा करतात.

   

  Join Us on https://www.facebook.com/SheThePeoplePage

  Follow Us on https://twitter.com/SheThePeopleTV